तरुणांमध्ये कोलन कॅन्सर(Risk of Colon Cancer in Young People in Marathi) चा वाढता धोका
कोलन कॅन्सर(Colon Cancer):
पोटाच्या समस्या मुख्यतः पचनसंस्थेमधे (Digestive System)बिघाड झाला की उद्भवतात. तरुणांमध्येही कोलन कॅन्सरचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे.आजकाल मुले नैसर्गिक पदार्थापेक्षा पॅकेटबंद वस्तू, प्रोसेस्ड फूड जास्त प्रमाणात खातात.कोलन कॅन्सर साठी बहुतेकदा बद्धकोष्ठता, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा पोटदुखीच्या समस्याच कारणीभूत ठरतात. तेव्हा पोटदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजाराची सुरुवात मोठे आतडे किंवा गुदाशयात होते.
लक्षणे(Symptoms):
- बद्धकोष्ठता(Constipation), पोटदुखी, मूळव्याध, स्टूलमध्ये रक्त आणि मोठ्या आतड्यांमध्ये जळजळ होत
- डाव्या बाजूचा कर्करोग असेल तर पोटदुखी आणि गुदाशयात रक्त येण्याचा त्रास होत असतो मात्र यामध्ये उलट्या किंवा थकवा येत नाही.
- उजव्या बाजूचा कर्करोग असेल तर थकवा जाणवतो
- आतड्यांमध्ये गाठी आढळतात
- तरुणांमध्ये कोलन कॅन्सर वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तणावपूर्ण वातावरण.
- लठ्ठपणा हा एक आजार असून यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते
उपचार(Treatment):
- कोलन कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी समतोल आहार(balanced diet) घ्यावा लागेल .
- पॅकेज केलेले स्नॅक्स, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट्स, कँडीज, सोडा ड्रिंक्स इत्यादींमध्ये भरपूर मीठ किंवा साखर असते, जे आरोग्याला हानीकारक असते.
- जंक फूड आणि मसालेदार पदार्थ खाणे कमी करा किंवा ते वर्ज्य करा. कारण तळलेले आणि जंक फूड बनवण्यासाठी खूप तेल, तूप आणि फ्लेवरिंग रसायने वापरली जातात, जी शरीरात जातात आणि आतड्यांचं नुकसान करतात
- फळे, हिरव्या भाज्या आणि सर्व प्रकारची व्हिटॅमिन यांचा आहारात समाविष्ठ नक्कीच फायदेशीर ठरेल.
- अल्कोहोल ही अशी गोष्ट आहे जी कोलन कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते.
- शरीराच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवल्यास हा कर्करोग होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.
- पुरेशी झोपही आवश्यक आहे. शरीराचा आरामही महत्त्वाचा आहे.
- नियमित व्यायाम व योगा यांनीही खूप फरक पडेल कारण कोणत्याही प्रकारचा कॅन्सर टाळण्यासाठी आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे महत्वाचे आहे. चांगलं आरोग्य फक्त खाण्यापिण्याच्या वस्तूंमधून मिळत नाही तर त्यासाठी व्यायामाचीही आवश्यकता असते.
- काही वेळा हा रोग अनुवंशिक ही असू शकतो. मात्र योग्य ती काळजी घेतली तर पुढचा धोका टळू शकतो.
- आतड्यातील गाठ वेळीच आढळून आली तर त्याच्यावर सहज उपचार केले जाऊ शकतात.
जर तुम्हाला कोणतही अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने उपचार घ्या आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. सुमित शाह
डॉ. सुमित शाह प्रोलाइफ कैंसर सेंटर एंड रिसर्च इंस्टीट्यूट (Prolife Cancer Center and Research Institute) संस्थापक आहेत. या सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात.डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन(Surgical Oncology and Laproscopic Surgeon) आहेत. त्यांनी कॅन्सर सेंटर वेल्फेअर होम येथे सुपर स्पेशालिटी कोर्स केला आहे.डॉ. सुमित शहा यांनी 20000 हून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग कॅन्सर सर्जन म्हणून सन्मानित केले गेले आहे.
डॉ. सुमित शाह शिक्षण : डीएनबी (जनरल सर्जरी), डीएनबी (सर्जिकल ऑन्कोलॉजी) लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप केलेले आहेत.